पाखरा पाखरा

 पाखरा पाखरा


पाखरा पाखरा

येऊन जा, येऊन जा;

बाळाच्या गालाची

एक पापी घेऊन जा!


 

पाखरा पाखरा

येऊन जा, येऊन जा;

बाळ गेलंय आंघोळीला

चार थेंब न्हाऊन जा!

 





पाखरा पाखरा

येऊन जा, येऊन जा;

बाळ करतंय में में आता,

तूही थोडं जेवून जा!

 

पाखरा पाखरा

येऊन जा, येऊन जा;

बाळ करतंय गाई गाई,

गोड गाणं गाऊन जा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा