भाजी घ्या
भाजी घ्या भाजी आणलिया ताजी । धृ।
शेतातील कांदे नुकतेच खणले टोपलीत भरले विकायला आणले
भाजी करा. कुणी भजी करा, भाजी घ्या ।१।
झाडावरची वांगी नुकतीच तोडली टोपलीत भरली विकायला आणली.
भाजी करा, कुणी भरीत करा, भाजी घ्या । २।
वेली वरच्या शेंगा नुकत्याच खुंडल्या,
टोपलीत भरल्या विकायला,
भाजी घ्या, कुणी उसळ करा, भाजी घ्या । ३।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा