खरं की काय ?

 खरं की काय ?

 

शनिवारी खातात चणे

ते डुक्कर होतात म्हणे !

 

रविवारी लवकर उठतात

त्यांना दोन शिंगे फुटतात !

 

सोमवारी खातात पान

त्यांचे होतात लांब कान !

 

मंगळवारी अभ्यास करतात

त्यांच्या केसांत उवा भरतात !

 

बुधवारी तोडतात फुले

त्यांचे होतात मोठे कुले !

 

गुरुवारी खातात उसळ

त्यांच्यामागे लागते मुसळ !


शुक्रवारी आंघोळ करतात

त्यांना येऊन पोलीस धरतात !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा