गुंडोराव गडबडे

 गुंडोराव गडबडे

 

गुंडोराव गडबडे,

भलतेच होत धडपडे !

 

इकडे पहा, तिकडे पहा;

अंगावरती सांडला चहा !

गुंडोराव गडबडे,

भलतेच होते धडपडे !

 

खाण्याची घाई लावली,

आपलीच आपण जीभ चावली !

गुंडोराव गडबडे,

भलतेच होते धडपडे !


 

धावता धावता घसरले,

रस्त्यावरती पसरले !

गुंडोराव गडबडे,

भलतेच होते धडपडे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा