आजी मी तुझ्याशी खेळेन गं

आजी मी तुझ्याशी खेळेन गं

ये आजी मी तुझ्याशी खेळेन गं । धृ।

हंड्यावरती तापेल चुलीवरती पातेल,


 तुझे माझं घरकुल मांडीन गं मांडीन गं

 दाण्याचा लाडू गुळाची पोळी,

 पोहयांचा भात तुला शिकवेन गं,



 भरा भरा जेवीन ऑफिसला जाईन,

 येताना खाऊ तुला आणेन गं आणेन गं ।१।


रात्र करू मामाची, गोष्ट सांगू राजाची,

 तुझ्या कुशीत मी, झोपेन गं, झोपेन गं.

 

ये आजी मी तुझ्याशी खेळेन गं । धृ।






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा