पंपुने केले साबणाचे फुगे
पंपुने केले साबणाचे फुगे (२)
मोठे गेले पुढे आणि छोटे राहिले मागे
एक फुगा एक फुगा आहा SSSS
एक फुगा, पंपुच्या गालावर बसला (२)
पंपुला तो आईचा पापाच वाटला
एक फुगा पंपुच्या हातावर बसला
पंप्पुला तो मोठा लाडूच वाटला
पंपुने केले साबणाचे फुगे
मोठे गेले पुढे आणि छोटे राहिले मागे.
एक फुगा पंपुच्या गालावर बसला
एक फुगा पंपुच्या डोक्यावर बसला
पंपुला मोठी गंम्मत वाटली
पंपुने केले साबणाचे फुगे
एक फुगा, एक फुगा, आहा SSSSS
एक आजोबाच्या चष्म्यावर बसला,
पंपुला तो तिसरा डोळाच वाटला.
पंपुने केले साबणाचे फुगे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा