सत्यम् शिवम् सुदंरा

 सत्यम् शिवम् सुदंरा

 

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

सत्यम् शिवम् सुदंरा

शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ति दे

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा (२)

 

विदयाधन दे आम्हास एक छंद एक ध्यास,

नाव ने पैलतीरी दया सागरा

होउ आम्ही नितीमंत उलाभुणी बुध्दीमंत किर्तीचा कळस जाई उंच अंबरा (२)

 

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा (२)

सत्यम् शिवम् सुदंरा

 

जेवणापूर्वी म्हणावयाचे श्लोक

धुवा हात पाय चला भोजनाला ।

बसा नीट देवो तुम्ही मांडी घाला ।

नका मागू काही, अधाशीपणाने ।

नका टाकू काही, करा स्वच्छ पाने ।

 

मुखी घास घेत करावा विचार ।

कशासाठी हे अन्न मी जेवणार ।

घडो माझिया हातून देश सेवा ।

म्हणोनी मिळावी मला शक्ती देवा ।

गुख्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा ।

गुरूर्साक्षात परब्रम्ह तस्मैश्री गुरूवे नमः।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा