चांदोमामा घर

चांदोमामा घर

चांदोमामा घर तुझे लांब लांब,

पाय दुखतील चालुन गडया थांब थांब,

चालू नको गडया असा झप झप,

लिंबोणीच्या झाडामागे लप लप,

लिंबोणीचे झाड आहे छान छान



 तुझ्यासारखी आई माझी गोरी गोरी पान,

तुझ्यासारखा चेहरा तीचा गोल गोल,

भाऊ ना रे आईचा तू बोल बोल,

तुझ्यासाठी खाऊ केला गोड गोड,

 आळी मीळी गुपचिळी सोड सोड.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा